पन्ना – वाघांची डरकाळी पुन्हा ऐकू येऊ लागली
पन्ना राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९८१
साली झाली असून, १९९४ साली या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात
आले. मध्य प्रदेशातील पन्ना आणि छत्तरपूर जिल्ह्यात स्थित पन्ना व्याघ्र प्रकल्प, खजुराहो
पासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर असून ५४७ चौरस कि.मी. कोर जंगल क्षेत्रात आणि १००२
चौरस कि. मी. बफर क्षेत्रात पसरलेले असून, देशातील सर्वात सुंदर व्याघ्र प्रकल्पा
पैकी एक आहे.
विविध वन्य प्राणी आणि विशिष्ट वनस्पतीने
समृध्द पन्ना व्याघ्र प्रकल्पातून केन नदी दक्षिण ते उत्तरेच्या दिशेने वाहते. चित्ता, लांडगा, अस्वल, सांबर, हरिण, चितळ, नीलगाय, चिंकारा असे वन्य प्राणी आणि २०० पेक्षा
जास्त पक्ष्यांच्या प्रजातींचे हे घर आहे. मुख्य म्हणजे पन्ना व्याघ्र प्रकल्प
किवां टाईगर रिझर्व विषेशतः वाघांसाठी प्रसिद्ध आहे. वाघाला नैसर्गिक परिसरात
पाहणे हे खरोखरच रोमांचक आणि अलौलिक दृश्य असतं.
२००७ साली पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या तर्फे पन्ना
व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यान म्हणून सन्मानित करण्यात आले. त्या
वेळेस पन्ना, २४ वाघांचे घर होते, पण २००९ येई पर्यंत या राष्ट्रीय सन्मानित उद्यानात
वाघ नाहीसे झाले. याचे मुख्य कारण, वाघांचे अवैध शिकार.
आपल्या गाई म्हशींना धोका म्हणून काही
वाघांना गावकऱ्यांनी मारले, काही वाघ आजारपणा मुळे तर काही वृदध होऊन मेले. या मुळे संपूर्ण उद्यानात फक्त एकच वाघ उरला. ज्या व्याघ्र
प्रकल्पात काही वर्षापूर्वी अनेक वाघ होते तिथे आज फक्त एक वाघ उरला हे जेव्हां वन
अधिकाऱ्यांच्या लक्षात आले तेव्हां त्यांच्या समोर गंभीर परीस्तिथी निर्माण झाली.
वन विभाग आणि राज्य सरकारने पन्ना व्याघ्र
प्रकल्पात पुन्हा वाघांची संख्या वाढवण्या करीता प्रयत्न सुरु केले. जंगलात
उरलेल्या एक वाघा साठी T1 नावाची वाघीण कान्हाहुन आणि T2 नावाची वाघीण बांधवगढहुन
आणण्याचा निर्णय घेतला. त्या काळी वाघांना रेडियो कॅलरिंग केल्या नसल्या मुळे,
त्यांच्या हालचाली ट्रॅक करणे अशक्य होते. म्हणून जेव्हां T1 आणि T2 वाघीण पन्नाला
पोहोचल्या तेव्हां जंगलातला एकमेव वाघ सापडेना, तो नक्की कुठे गेला हे शेवट पर्यंत
कळलेच नाही. कदाचित तो जोडीदाराच्या शोधात दुसऱ्या जंगलात चालला गेला असावा.
असे प्रकरण पुन्हा घडू नये, सर्व
वाघांच्या हालचाली वर नजर ठेवता यावी, त्यांचा अवैध शिकार थांबवता यावे म्हणून
पुढे या प्रकल्पातल्या सर्व वाघांना रेडियो कॅलरिंग करण्याचे योजिले गेले. यशस्वी वाघ संरक्षणा साठी हे
पहिले मोठे पाऊल होते.
पन्ना अभयारण्यणाचा एकमेव वाघ गायब
झाल्यामुळे T1 आणि T2 वाघीण पुन्हा एकटे पडल्या, त्यांना सोबत म्हणून कान्हा व्याघ्र
प्रकल्पातला T3 नावाच्या वाघाला रेडियो कॅलर लाऊन जंगलात सोडून तर दिले, पण T1, T2
आणि T3 एकमेकांना स्वीकारतील की नाही याची काळजी मात्र प्रकल्पातल्या
कर्मचाऱ्यांना लागली होती. जंगलात सोडण्याच्या काही दिवसातच T3 ने कान्हात पळून
जायचा प्रयत्न केला. त्यांनी पन्नाची सीमा ओलांडू नये म्हणून त्याला पकडावे लागले.
पुन्हा जंगलात सोडल्यावर T3 ने पन्ना सोडू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक होते. या
वेळेस त्याला सोडण्याच्या आदि त्याच्यावर मुत्र प्रयोग करण्यात आला. भोपाळ प्राणी संग्रहालयातल्या
दोन वाघीणींचे मुत्र जंगलात जागोजागी शिंपडले गेले, T3 च्या पिंजऱ्यात ही काही
थेंब शिंपडण्यात आले. कर्मचाऱ्यांनी केलेला मुत्र प्रयोग यशस्वी ठरला आणि T3
ला जंगलात सोडण्याच्या चार दिवसातच त्याने
T1 वाघीणला शोधुन काढले. लवकरच T1 वाघीण बाळांतीण झाली आणि १६ एप्रिल २०१० ला तीने
चार स्वस्थ व निरोगी पिल्लांना जन्म दिला. पन्नात पुन्हा एकदा वाघ वावरू लागले, हे
इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचा परिणाम
होता. १६ एप्रिल २०१० मधे वाघांचे पहिले शावकांचे जन्म, ही या प्रकल्पासाठी आनंदाची
बातमी होती. तेव्हां पासून दर वर्षी १६ एप्रिल चा दिवस केक कापून प्रकल्पात साजरा
केला जातो. येणाऱ्या दिवसात T2 वाघीण ला T3 पासून चार पिल्लं झाले. पन्ना व्याघ्र
प्रकल्पात २००९ नंतर पहिल्यांदा ११ वाघ वावरत होते.
या दरम्यान, कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघांची
दोन अनाथ पिल्ले T4 आणि T5 वन कर्मचाऱ्यांना सापडली. त्यांना सुद्धा पन्नात आणले
गेले. त्यांच्या संगोपनाची विशेष काळजी घेऊन नैसर्गिक वातावरणात ठेवण्यात आले.
पाहता पाहता T4 आणि T5 ला पन्नात येऊन अठरा महिने झाले. आता त्यांना जंगलात
सोडण्याची वेळ आली. माणसांच्या सहवासात राहणारे T4 आणि T5 वाघीण, जंगलात दुसर्या
वाघांसोबत टिकू शकतील का ? शिकार करून स्वताःचे पोट भरू शकतील का आणि आपला परिवार
वाढवू शकतील का असे अनेक प्रश्न वन अधिकार्यांच्या मनात त्यांना जंगलात सोडताना
येत होते.
२०११ साली T4 आणि T5 वाघीणींना जंगलात
सोडण्यात आले. काही दिवसात T4 ची भेट T3 शी होणार होती. T4 ला जंगलात सोडून जास्त
दिवस झाले नव्हते, अजून ही तीने एकही शिकार केली नव्हती, आयुष्यात पहिल्यांदा तिचा
सामना वाघा सोबत होणार होता, अशा परिस्तीथीत तिची रानात जिवंत राहायची भीती
अधिकाऱ्यांना वाटू लागली. T3 आणि T4 ची जोडी जमवण्या करीता पुन्हा मुत्र प्रणालीचा
प्रयोग करण्यात आला. सगळ्यांना आश्चर्यात टाकून T3 आणि T4 ची जोडी लवकरच जमली.
सोबतीचा परिणाम T3 ला शिकार करताना पाहून T4 सुद्धा शिकार करायला शिकली. तिला
शिकार करताना पाहून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा
पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला.
पहिल्या टप्प्याच्या यशाने वन
अधिकाऱ्यांना दुसरा टप्प्या सुरु करायचे धैर्य दिले. दुसऱ्या टप्प्यात बाहेरून
आणलेले व्यस्क वाघ आधी स्थलांतरीत झालेले वाघांच्या सोबत मिळून राहु शकतील की नाही
हे बघायचं होतं. या योजनेप्रमाणे T6 नामक व्यस्क वाघाला पेंचहुन इथे आणण्यात आले.
T6 ने स्वताःला नवीन वातावरणात आरामात जमवून घेतल्या मुळे सर्वांची काळजी मिटली. T6 ने केवळ नवीन वातावरणाशी नुसतेच
स्वताःला जमवून घेतले नाही, तर त्याने प्रजजनास सुरुवात पण केली. T3 आणि T6 ने मिळून जवळपास १५ शावकांना जन्म
दिला आहे. २०१४ ला झालेल्या व्याघ्र गणने नुसार पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघांची
संख्या ३२ पर्यंत पोचली आहे. आज पन्नात स्थलांतरीत केलेल्या वाघांपासून जन्मलेले
पहिल्या पिढीचे शावक व्यस्क झाले असून त्यांनीही प्रजजनास सुरुवात केली आहे.
फक्त एक दशकापूर्वी एक ही वाघ नसलेल्या
पन्ना अभयारण्यात आज वाघांची गर्जना पुन्हा ऐकु यायला लागली आहे आणि पर्यटकांना
नेहमीच वाघ दर्शन देऊ लागले आहे. हे सगळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या व
अधिकाऱ्यांच्या परिश्रमा मुळे शक्य झाले. गावकऱ्यांना वन्य जिवांबद्दल माहिती देऊन
त्यांचे आपल्या जीवनातील महत्व पटवून दिल्यामुळे गावकऱ्यांचे पूर्ण सहकार्य या
कार्यात मिळवणे हा वाघ संरक्षणाच्या कार्यात महत्वाचा टप्पा मानायला हरकत नाही.
गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना कोर आणि बफर श्रेत्रातून प्रकल्पाच्या बाहेर
स्थानांतरित करण्यात आले. आता गावकरी आपल्या परिक्षेत्रातील वन्य जिवांचे रक्षक
झाले आहेत आणि वन्यजीव संरक्षणस मदत करत आहे.
वाघांच्या बाबतीत लोकांची विचार
करण्याची पद्धत बदलणे आणि वाघांच्या संरक्षणा साठी लोकांना प्रेरित करणे हेच व्याघ्र
संरक्षण प्रकल्पाचे यश आहे.
भेट देण्याची योग्य वेळ
१ अक्टूबर ते ३० जून आहे. पावसाळ्या
मुळे 1 जुलाई ते ३० सप्टेंबर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असतो.
कसं पोचायचं
पन्ना व्याघ्र प्रकल्प खजुराहो, सतना,
झांसी आणि जबलपूर पासून जवळ आहे. जवळचे विमानतळ जबलपूर आणि खजुराहो आहे.
कुठे थांबायचं
माडला स्थित जंगल कैम्प किवां खजुराहो
स्थित हॉटेल झंकार, हॉटेल पायल, टुरिस्ट विलेज मधे मध्य प्रदेश पर्यटन तर्फे
राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
सौ वंदना मुळे- ९४२०८५५४३२, ९३७१९७८८५३
भेट देण्याची योग्य वेळ
१ अक्टूबर ते ३० जून आहे. पावसाळ्या
मुळे 1 जुलाई ते ३० सप्टेंबर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असतो.
कसं पोचायचं
पन्ना व्याघ्र प्रकल्प खजुराहो, सतना,
झांसी आणि जबलपूर पासून जवळ आहे. जवळचे विमानतळ जबलपूर आणि खजुराहो आहे.
कुठे थांबायचं
माडला स्थित जंगल कैम्प किवां खजुराहो
स्थित हॉटेल झंकार, हॉटेल पायल, टुरिस्ट विलेज मधे मध्य प्रदेश पर्यटन तर्फे
राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
सौ वंदना मुळे- ९४२०८५५४३२, ९३७१९७८८५३